" आपण आणि पोर्नोग्राफी : राजकीय चर्चेच्या पलीकडे "
भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून काही पोर्नोग्राफिक साईट्स वरच्या बंदीचा निर्णय काल घेतलाय . या निर्णयाविरोधात दुमत नसाव असा मुद्दा म्हणजे --लोकशाहीच्या चौकटीत आणि विशेषत: सन २०१५ मध्ये मी , माझ्या घरात , खोलीत , कुठल्याही खासगी ठिकाणी पॉर्न पाहूच शकतो . हा माझा १००% हक्क आहेच . परंतु सोशल मिडिया आणि एकंदरीतच याविषयीच्या चर्चेत सध्या अनेकांकडून (सन्माननिय अपवाद सोडून ) मोदी शासनाच्या धोरनांना विरोध करण्याच्या नादात (मोदी भक्तां प्रमाणेच ) आक्रस्ताळे होऊन पॉर्नचे दुष्परिणाम नाहीतच -नसतातच , उलट बघा - आणखी बघा , स्वातंत्र्यावर घाला घातलाय तर बघाच ,असा जो संदेश थेट किंवा अनावधानाने दिला जातोय. तो चुकीचा आहे असं वाटून गेलं .भलेही त्यांची तशी इच्छा किंवा उद्देश नसेल परंतु शासनाच्या दमनकारी निर्णयाला विरोध करतांना (कदाचित ) चुकीच्या दिशेने तर संदेश जात नाहीय ना हे पाहणे गरजेचे वाटते . बर्याच जणांनी तर याचा संबंध अगदी अजिंठा, खजुराहो आणि प्राचीन आर्ष चालींशी जोडून वेगळाच सूर लावलाय . तोही त्याच दिशेने .
मला वाटत पोर्नोग्राफी या विषयाबाबत
१ ) व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील 'राज्याचे' अतिक्रमण
आणि
२) पोर्नोग्रफिसारख्या विषयाचे सध्याच्या भारतीय ( मर्यादित अर्थाने ) तरुण / तरूणी वर होणारे चांगले वाईट परिणाम
अशी वेगवेगळी चर्चा होणे गरजेचे आहे .
पहिल्या मुद्द्याबाबत वाद नाहीचंय . किंबहुना लोकशाहीत काय करायचं , कुणी करायचं , आणि किती प्रमाणात करायचं हा वेगळाच वादाचा विषय आहे .आणि तसही तांत्रिक दृष्ट्या ते राबवणार कस हा वेगळा विषय . परंतु पॉर्नच्या चांगल्या - वाईटाची (नुसत्या वाईटाची नव्हे )चर्चा करणे गरजेचे नाही का ?(सध्या फक्त पॉर्न व्हिडीओ म्हणून जे काही रूढ आहे त्याविषयीच आपण बोलूयात . उगाचच EROTIC काय.. त्यात वेगळं काय आणखी वगैरे यात आत्ता पडायला नको )
पोर्नोग्रफिच्या दुष्परीनामाचे अनेक दाखले देता येतील . त्यातले बारीकसारीक तपशील सोडले तरी साध्या आकलनाने त्याचे दुष्परिणाम सांगता येतील. उदाहरणादाखल श्री .गोपाळ आजगावकर यांनी पोर्नोग्राफी - चाइल्ड पोर्न - ग्र्यानी (आजी ) सेक्स - रेप पॉर्न आणि लैंगिक विकृततेतून येणारी गुन्हेगारी याचा शास्त्रीय पद्धतीने संबंध दाखवणारा लेख"मुक्त शब्द Mukta Shabd" या मासिकात गेल्या वर्षी लिहिला होता . त्यात त्यांनी झालेल्या घटना , गुन्हे आणि पोर्न यांचा संबंध व्यवस्थित दाखवून दिला आहे . आपल्यापैकी बर्याच जणांना हे दुष्परिणाम स्वानुभवाने देखील माहित असतील किंवा पाहण्यात असतील . त्यावर बराच खल झालेला आहे . बर्यापैकी पोर्नोग्राफी चे तोटे प्रचलित आहेत .
आता समजा आपण हे गृहीत धरलं की पॉर्न वाईट आणि एखादी वाईट गोष्ट (संज्ञेच्या खोलात न जाता … 'वाईट' काय हे सापेक्ष हे मान्य! ) बंद करणे हि लोकनियुक्त शासनाचे नैतिक कर्तव्य असतेच . (दुर्दैवाने समलैंगिकतेच्या बाबतीत "वाईट" संज्ञेच्या सापेक्षतेचा चुकीचा संदर्भ समोर येतोचय .… चांगल काय आणि वाईट काय असा सार्वकालिक संघर्ष थोडा दूर ठेऊ क्षणभर) .त्यामुळे बंदी घातली तर बिघडल कुठे . तरीही पुढचा भयानक मुद्दा येतो तो म्हणजे उद्या कुठलही शासन समाजासाठी वाईट काय हे विनाचर्चा ठरवू लागलं आणि थेट बंदी घालायला लागल. . तर या बंदीला केवळ पोर्नचे दुष्परिणाम डोक्यात ठेवून पाठींबा देउन "काळ सोकावन्याच " भय आहेच . कारण एकदा असा पायंडा पडला तर इथे "संस्कृतीसमाजसंस्कार"-संरक्षकांची कमी नाहीय . ते चेकाळतील . निर्णयाला अशा वातावरणात पाठींबा देणे म्हणजे पुढच्या पिढीवर अन्याय करण्यासारखे .
हि झाली राजकीय भूमिका. पण एक चित्र डोळ्यासमोर आणा . थोडावेळ राजकीय भूमिका सोडून , बौद्धिक खुमखुमिला फाटा देऊन. एखाद्या १६ वर्षाच्या मुला / मुलीने त्याच्या / तिच्या खोलीत पोर्न पाहत असण्याच चित्र . आपल्या सद्सद विवेकबुद्धीला स्वातंत्र्याच्या भूमिकेतून पटत असल तरी आपल्याला त्या जीवावर होणारे दुष्परिणाम चालतायत का ? मला खरोखर अस वाटत का-, कि माझ्या दहावी - बारावी तल्या लहान बहिणीने , भावाने ,मुलाने , मुलीने "SON FORCES MOM TO FUCK"," INNOCENT DAUGHTER FUCKED BY FATHER"," VERY OLD GRANNY FUCKS GRANDSON अशा विषयांची दृश्य पहावीत ? ते खरच आपल्याला चालत ? माझी गोची होते या प्रश्नात . स्वातंत्र्य हिरावून घ्याव कि (कुणी दुसर्याने ठरवलेलं )हित पहाव ही ती गोची
उत्तर ज्याची त्यांनी शोधावीत . मी फक्त मला पडणारा प्रश्न विचारतोय .
बदलत चाललेल्या सामाजिक मानसिकतेत आणि एकंदर मुक्त लैंगिकतेला मी विरोध करत नाहीय . तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे . पण पुन्हा एक प्रश्न माणसामाणसातली "मुक्त लैंगिकता " आणि "विकृत लैंगिकता " या दोन्ही गोष्टी एकच आहेत का ? नाही . निश्चित नाही . एडीट केलेले , तासतासभर चाललेले संभोग , साधारण मर्त्य मानवाला अशक्य असणाऱ्या गोष्टी - यातून कितीतरी तथाकथित सुशिक्षितांचे संभोग कालावधी बाबतचे भयानक अज्ञान , कामप्रेरणेबाबतच्या समस्या आणि त्यातून येणारे मानसिक विकार ,गुन्हे , याचा विचार आपण गांभीर्याने करतोय का . . सध्या तरी नाही . आणि या गदारोळात तिकडे लक्ष जाण्याची शक्यताही कमीच .
त्यात सध्या मिडियाला अतिप्रिय असणारा विषय 'बलात्कार' आणि त्या अनुशंघाने पोर्नचा संबंध . पोर्न हे बलात्काराच एक कारण आहेच . पण एकमेव नाही . पॉर्न पहिला कि चालले बलात्कार करायला अस नाही पण पॉर्नमुळेही बलात्कार होऊ शकतो . झालेले आहेत . बलात्कारामागच्या DRIVING FORCE पैकी तो एक (किमान आजच्या काळात )आहेच . भले त्याच प्रमाण कमी जास्त असेल .
परंतु बलात्कार होतात म्हणून पॉर्नबंदी हेही बालिश आहेच आणि पॉर्नचा आणि बलात्काराचा संबंधच नाही हे ठोक आणि थेट सांगणे हे त्यापेक्षा जास्त भंपक विधान म्हणाव लागेल . बलात्कारामागची पुरुषी मानसिकता आणि इतर गोष्टी मान्यच . जीवशास्त्रीय म्हणूनही काही गोष्टी असतात . ते बघायला हव .
आता पोर्नबाबत चांगलं काय तेही शोधायला हव . नक्कीच आहे . पोर्नोग्राफी आणि तणाव मुक्तता यांचा संबंध याबाबतच लेखन , पेपर्स आहेत . पॉर्न पाहून मर्त्य साधारण मनुष्याकडून होणारी परिणती म्हणजे हस्तमैथुन आणि त्यातून तणाव , दमन यातून मुक्तता ,,, या गोष्टी आहेत .यापेक्षा जास्तही असू शकतील नक्कीच .
पण यात या प्रकारचा तणावमुक्ती / आनंदाचा अनुभव केवळ आपल्यापुरता मर्यादित ठेवत , इतरांना आणि स्वत : लाही हानी न पोचवता घेण्याची -
---- १. मानसिक ताकद
२ सामाजिक स्थिती
३ वैचारिक क्षमता
४ शास्त्रीय ज्ञान
- या गोष्टीं आजच्या आपल्या समाजात किती लोकांकडे आहेत जेणेकरून त्यातून होणार्या त्रासापासून ते स्वत:ला आणि समाजाला वाचवू शकतात . याबाबत तज्ञ जास्त चांगल सांगू शकतील . पण हे प्रमाण फार कमी असणार असा अंदाज कुणीही शहाणा माणूस लावू शकतो.
बाकीच्यांचं काय?
मला वाटत आपल्याकडे या विषयावर काम करण्याची , लिहिणार्यांनी लिहिण्याची जास्त गरज आहे . माझ्या लिहिनार्या / न लिहिनार्या मित्र मैत्रिणींना कळकळीची विनंती आपली बौद्धिक उर्जा एकाच दिशेने खर्च करण्याऐवजी आपण पोर्नोग्राफी - चांगल -वाईट - त्याची निर्मिती - त्यामागच अर्थकारण - यावर या निमित्ताने खूप साधकबाधक बोलू शकतो .तसं करणं तरुणांचा देश म्हणवणाऱ्या आपल्याला गरजेच आहे. हे कितीहि भाबडं आणि साध विधान वाटलं तरी एक लक्षात ठेवाव लागेल कि भाबड्या , ध्येयवादी चर्चेतूनच हातात काही येण्याची शक्यता जास्त. केवळ टीकाटिप्पणी पेक्षा ते कधीही लाभदायकच. नाहीतर प्रेमानंद गज्वी Premanand Gajvee सरांच्या शब्दात सांगायचं तर फेसबुक वरच्या चर्चा म्हणजे केवळ शेळीच्या शेपटासारख्या - ढुंगणहि झाकना आन माशाही उठना अस व्हायचं नेहमीसारख.एकांगी चर्चा नकोच . अन्यथा या विषयासंदर्भात केवळ राजकीय आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने घेतलेली हि भूमिका , आजच्या पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना पोर्नोग्रफिची तरफदारीच वाटू शकते . .
( जाता जाता - एड्स निर्मुलनासाठी कंडोम ची पाकिटे वाटण्याआधी असुरक्षित - म्हणजेच अनोळखी व्यक्तींबरोबरचे संबंध टाळणं हे सांगण महत्वाच कि कंडोम चे फायदे ?… शेवटी याचा विचार ज्याने त्यानेच करावा.)
- स्वप्निल शेळके